नवव्या महिन्यात सोनोग्राफी कधी करावी?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 10:22

नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळेला सोनोग्राफी करतात व गरजेप्रमाणे जास्त वेळेसही सोनोग्राफी करावी लागते. पहिली सोनोग्राफी दीड ते दोन महिन्यांत (सहा ते आठ आठवडे) करतात. यामध्ये गर्भधारणा आहे की नाही हे निश्चित केले जाते. दुसरी सोनोग्राफी तीन ते चार महिन्यांत (११ ते १४ आठवडे) करतात.

गर्भावस्थेतील सोनोग्राफी

गर्भ राहिल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल बघणे हे केवळ सोनोग्राफीमुळे साध्य झाले आहे. अगदी बाळाच्या ठिपक्याएवढ्या अंशापासून ते त्याची जडणघडण आणि पूर्ण वाढ आपण नोंद करू शकतो. याशिवाय गर्भात असणारे आजार, विकार, दोष यांचीही बऱ्याचअंशी माहिती मिळवू शकते. गर्भवतीची सोनोग्राफी करणे हा इतर चाचण्यांबरोबर असणारा नेहमीचा एक भाग आहे. नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळेला सोनोग्राफी करतात व गरजेप्रमाणे जास्त वेळेसही सोनोग्राफी करावी लागते.

पहिली सोनोग्राफी दीड ते दोन महिन्यांत (सहा ते आठ आठवडे) करतात. यामध्ये गर्भधारणा आहे की नाही हे निश्चित केले जाते. दुसरी सोनोग्राफी तीन ते चार महिन्यांत (११ ते १४ आठवडे) करतात. गर्भामध्ये व्यंग आहे का, हे तपासण्यासाठी मोठ्या आजारांची एक प्राथमिक तपासणी व निदान आपण सोनोग्राफीद्वारे करू शकतो. तिसरी सोनोग्राफी चौथ्या ते पाचव्या महिन्यात (१८ ते २२ आठवडे) केली जाते. यामध्ये गर्भाचे डोके, पाठ, पोट, हृदय, हातपाय, चेहरा यांची व्यवस्थित तपासणी केली जाते. चौथी सोनोग्राफी सात ते आठ महिन्यांत (२१ ते ३२ आठवडे) करतात. यालाच ‘ग्रोथ स्कॅन’ असेही म्हणतात. यामध्ये बाळाची वाढ, गर्भजलाची पातळी, बाळाचे वजन बाळातील जन्मदोष अशा बऱ्याच बाबींकडे लक्ष दिले जाते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info